Type Here to Get Search Results !

एकात्मिक विकास'च्या बारामती तालुका अध्यक्षपदी संभाजी होळकर.

'एकात्मिक विकास'च्या बारामती तालुका अध्यक्षपदी संभाजी होळकर.
बारामती प्रतिनिधी

राज्य शासनाच्या 'एकात्मिक विकास' साठी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बारामती तालुकाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड करण्यात आली, संभाजी होळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष आहेत. 
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या निर्णयानुसार ही समिती गठित केली. 
या समितीत संभाजी होळकर यांच्यासह 

. बाळासाहेब शंकरराव परकाळे (अंजनगाव), 
. सुशांत महादेव जगताप (सुपे),
. मंगेशदत्तात्रयखताळ (तरडोली), 
. निखिल चांगदेव देवकाते (मेखळी), 
. रमेश शंकरराव इंगुले (बारामती), 
. वनिता रवींद्र बनकर, 
. अनिता सुरेश गायकवाड (बारामती) 
यांचाही समावेश आहे.

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा बनकर व शहराध्यक्षा गायकवाड यांना या समितीत स्थान मिळाले
आहे. 

राज्य विधानपरिषदेचे सदस्य या समितीचे
सदस्य असतात. याशिवाय तहसील विभागातील खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष सदस्य म्हणून काम पाहतात. तहसीलदारांकडे सदस्य सचिव ही
जबाबदारी असते. ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण आणि
व्यापक विकास लक्षात घेत ही समिती गठित केली जाते. अध्यक्षपदी कोणाची निवड करायची, याचे सर्वाधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना असतात.
बारामतीचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आहेत. त्यामुळे
त्यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी संभाजी होळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test