Type Here to Get Search Results !

सोमेश्वर मधील "सती मालुबाई मंदिर" येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ५२ वा वाढदिवस साजरा..

सोमेश्वर मधील "सती मालुबाई मंदिर" येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ५२ वा वाढदिवस साजरा..

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील करंजे-माळवाडी येथील असणाऱ्या "सती मालुबाई मंदिर"  ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ५२ वा वाढदिवस बारामती पंचायत समिती सदस्या मेनका मगर, तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्या सुचिता साळवे यांच्या  शुभ हस्ते वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वरिष्ठ मंडळाच्या सूचनेनुसार खासदार सुप्रिया ताईं सुळे यांचा  वाढदिवस सर्व पदाधिकारी यांनी  वृक्षारोपण करतच साजरा करावा असे  आव्हाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते त्या अनुषंगाने  "सती मालुबाई" मंदिर परिसरात चिंच, वड, पिंपळ,करंज, चाफा अश्या ऑक्सिजन देणारी इतर ही झाडे चे वृक्षारोपणही  मान्यवरांच्या हस्ते करत वाढदिवस साजरा केला.
   तसेच वाढदिवसाचे अवचित्य साधत नुकतीच आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मंगेश शेंडकर तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्या सुचिता साळवे यांचा शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री सोमेश्वर सेवा भावी सस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे,प्रणाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे,उपाध्यक्ष नितीन शेंडकर,करंजे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे,वाकी ग्रा.सदस्य अनिल भंडलकर,भगवान (गुरुजी)जोशी, चौधरवाडी माजी सरपंच यादवराव शिंदे,सेवानिवृत्त मुंबई पोपट चौधरी,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुंबरे,सुनील जोशी प्रतीक्षा झनजणे, दत्तात्रय चौधरी,नवनाथ मगर ,राजकुमार शेंडकर, अभिजित जगताप, सुचेता अभिजीत जगताप,पत्रकार विनोद गोलांडे,जितेंद्र काकडे उपस्थित होते.

कर्यक्रमाचे आयोजन श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था सोमेश्वर पंचक्रोशी यांनी केले तर सूत्रसंचालन व उपस्थित मन्यावारांचे आभार बुवासाहेब हुंबरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test