Type Here to Get Search Results !

पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी – प्रा.दुर्गाडे

पत्रकारांनी आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवावी – प्रा.दुर्गाडे

समाजात पत्रकारांना अनन्यसाधारण महत्व असून पत्रकारांनी देखील आपल्या कार्यातून पत्रकारितेची उंची वाढवणे तितकेच  गरजेचे असल्याचे मत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.

    वाल्हे ( दातेवाडी )येथे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा,दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार बांधवांसाठी ओळखपत्र वाटपाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना प्रा.दुर्गाडे हे बोलत होते.

याप्रसंगी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांसह विरोधी पक्ष नेते जयदिप  बारभाई राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे ,युवा कार्यकर्ते अजिंक्य टेकवडे ,बारामती लोकसभा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सचिन दुर्गाडे , शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बरकडे ,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते ,शिवसेनेचे राहुलजी यादव सामाजिक कार्यकर्ते नाना दाते पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष कैलास पठारे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे पुरंदरचे तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ कार्याध्यक्ष गणेश मुळीक सचिव संभाजी महामुनी बारामतीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे उपाध्यक्ष विनोद गोलांडे ,अॅड .योगेश तुपे ,पांडुरंग ढोरे हभप.अशोक महाराज पवार तसेच बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.
      प्रा.दुर्गाडे पुढे म्हणाले कोरोनाच्या महामारीत अनेक अडचणींचा सामना करत   पत्रकारांनी समाज जनजागृतीचे महनीय कार्य केले असून ही सर्वांसाठी कौतुकास्पद बाब आहे .यापुढेही पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे कार्य सातत्याने करावे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संदिप बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संभाजी महामुनी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test