महत्वाची बातमी ; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वेळेत बदल ; कोणत्या वेळेत चालणार कामकाज
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दि.२१.०६.२०२१ रोजीपासून नवीन नवीन सॉफ्टवेअर अवलंब केल्यामुळे सदर कामकाज सुरळीतरित्या पुर्ण होण्यासाठी शाखांच्या रोख व्यवहाराची वेळ दि.२५.०६.२०२१ रोजी पर्यंत दु. ०४.०० वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे.परंतु, दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, पुरंदर व खेड विभागातील कर्जदार शेतकरी सभासदांना कर्ज रक्कमेचा भरणा वेळेत करण्यात यावा, यासाठी सदर विभागातील सर्व शाखांच्या रोख व्यवहाराची वेळ सकाळी ०९.३० ते सायं. ४.०० वाजेपर्यंत करण्यात येत आहे.दौंड, बारामती, इंदापूर, शिरूर, पुरंदर व खेड विभागातील सर्व शाखांनी आपल्या ग्राहकांना या बदलाबाबत प्रशासकिय माहितीनुसार केलेले बदल आहेत.