Type Here to Get Search Results !

तुम्हाला कोरोना होऊन गेलाय ? तर वाच ही बातमी.

तुम्हाला करोना होऊन गेलाय ? तर वाच ही बातमी..

 

करोनानंतर तुमच्या पैकी बरेच जण केस गळतीच्या समस्येला तोंड देत असतील. 
हो ना ! 
कोविडनंतर केस गळती होणे हे सामान्य असल्याचं वैद्यकिय तज्ज्ञ सांगतात. 
कोविड काळात आलेल्या मानसिक तणावामुळे केस गळतीच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांचे मत आहे. 
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ.स्तुती खरे शुक्ला म्हणाल्या,
 ” करोना झाल्यानंतर ७० ते ८० टक्के रुग्णांना केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
 ही समस्या सामान्य आहे. 
अशाप्रकारच्या केस गळतीला ‘टेलोजेन इफ्लुव्हियम'
(telogen effluvium) 
असे म्हणतात. 
हा तात्पुरते केस गळतीचा एक प्रकार आहे.
 केस गळायला सुरुवात झाल्यानंतर दोन ते चार महिन्यानंतर केस गळणे कमी होऊ लागते.
 असेही त्यांनी सांगितले. 

टेलोजेन इफ्लुव्हियम म्हणजे काय ? 

सध्या कोविडजन्य परिस्थितीमुळे आपल्या ताणतणावात प्रचंड वाढ झाली आहे. 
वाढलेला तणाव केस गळतीचं कारण ठरू शकतो. 
तसेच, सर्जरी, ताप यामुळे ही समस्या उद्भवू शकते. 
आपल्या केसांच्या चक्रामध्ये वेगवेगळे टप्पे असतात आणि जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपले केस विश्रांतीच्या अवस्थेत असतात, दोन – तीन महिन्यांनंतर केस गळायला सुरवात होते,”,
 असेही डॉ.स्तुती खरे शुक्ला यांनी सांगितले. 

डॉ.स्तुती खरे शुक्ला यांनी दिलेल्या काही टिप्स......
 
१). आहारात अंडी, चिकन, मासे, पालेभाज्या आदी प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. 
२). व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. 
यामुळे शरिरात हॅपी हार्मोन तयार होतात आणि नविन केसांची निर्मिती होते.
 ३). मल्टी व्हिटायमीन, अमिनो ॲसिड यांचा वापर केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो. 
४). Redensyl आणि  lypsyl 
या लोशनचा वापर करा. 
५). जास्त केस गळतीची समस्या असल्यास तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test