"सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची" या कार्यक्रमातील महाअंतिम सोहळ्यात वालचंदनगर च्या - राधा खुडे यांना तृतीय क्रमांक...
वालचंदनगर प्रतिनिधी
"सोनी कलर्स" मराठी वाहिनीवरील "सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची" या कार्यक्रमातील महाअंतिम सोहळ्यात वालचंदनगर च्या राधा खुडे या ९० गायिकेने आपल्या आवाजाचं खणखणीत नाणं वाजवीत तृतीय क्रमांक पटकावला आणि महाराष्ट्रातील तमाम रसिकांच्या मनावर वालचंदनगर चे नाव पुणे जिल्हा नावे महाराष्ट्रभर कोरल्याने इंदापूर तालुक्यातील जनतेने मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला वालचंदनगर कळंब आणि रणगाव या तीन गावाच्या वेशीवर वसलेल्या गार्डन चौक येथे पत्र्याच्या खोलीत राहणाऱ्या राधा खुडे या नवगायकीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात अंतिम सोहळ्यात पहिल्या तीन क्रमांकावर राहात वालचंदनगरचा स्वाभिमान उंचावला. आपल्या पहाडी आवाजाने परीक्षकांना सह उपस्थित मान्यवर व लाखो रसिकांची मने जिंकली तृतीय क्रमांक मिळविला ७५ हजार रुपयांचा रोख धनादेश ज्येष्ठ चित्रपट निर्माते गौतम राज्याध्यक्ष यांच्या हस्ते राधा खुडे हिने मिळवला.
"सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची."या चौथ्या पर्वातील गायनाची महानायिका होण्यासाठी अंतिम पर्वात पहिल्या ६ मध्ये पोहोचलेल्या गायिकांमध्ये वालचंदनगरच्या राधा खुडे या गायिकेने तृतीय क्रमांक पटकावला.यावेळी गौतम राजाध्यक्ष संगीतकार अनिल परब जेष्ठ गायक स्वप्नील बांदोडकर परीक्षक अवधूत गुप्ते व महेश काळे यांसह लाखों रसिकांची मने जिंकली.
तिच्या यशाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजराज भोसले व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकरी प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले , माजी सभापती करणसिंह घोलप, रणगावच्या सरपंच सुषमा राहुल रणमोडे, वालचंदनगरचे सरपंच कुमार गायकवाड आणि कळंबच्या सरपंच विद्या अतुल सावंत यांनी भरभरून कौतुक केले आहे.
फोटो ओळी:- "सुर नवा ध्यास नवा आशा उद्याची" या महागायिका सोहळ्याच्या अंतिम पर्वात वालचंदनगर येथील नव गायिका राधा