PMPL ची वरवंड ते हडपसर बससेवा सुरू;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ...
Live पुणे बारामती न्यूज नेटवर्क –
पुणे शहराचे उपनगर होत असलेल्या दौंड तालुक्यातील वरवंड येथुन पुणे महानगर परिवहन महामंडळाची वरवंड ते हडपसर बससेवा आजपासुन सुरु झाली.या आधी यवत पर्यंत पी म पी ल धावत होती
वरवंड येथे फुलांनी सजविलेल्या बसचे वरवंड व आसपास भागातील कडेठाण, माळवाडी, कुसेगाव हातवळण , गावच्या नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करुन बसचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी वरवंड गावातील शिवाजी चौकात रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेशआप्पा थोरात , पी म पी ल चे व्यवस्थापक राजेंद्र जगताप उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने उपस्थितांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
वरवंड गाव हे तालुक्यातील शिक्षणक्षेत्रात अग्रगण्य म्हणून मोठे प्रस्थआहे , दूध केंद्र,व फॅब्रिकेशन या बाबत अग्रगण्य , म्हणून ओळखले जाते, बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थी वर्गाचा व कामगार वर्ग चा प्रश्न सुटला ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, शेतकरी एक सरकारी हक्कची सुविधा मिळाल्याने चेहऱ्यावर आनंद दिसत होत. सुरवातीला पहिल्या दिवशीच बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी राष्ट्रवादी नेत्या माजी जिल्हा अध्यक्षा वैशालीताई नागवडे, जि.प.सदस्य विरधवल जगदाळे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, सरपंच मिनाताई दिवेकर, उपसरपंच प्रदिप दिवेकर आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीएमपीएमएल बसला हिरवा झेंडा दाखवून स्वतः वरवंड ते चौफुला असा प्रवास केला व तालुक्यातील नागरिकांना तसेच पी म पी ल चे व्यवस्थापक राजेंद्र जगताप यांचे आभार व्यक्त केले .