संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या आषाढी वारी संदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.त्यानूसार मानाच्या दहा पालख्यांनाच बस मधून वारी परवानगी देण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सलग दूसऱ्या वर्षी आषाढी पायी वारी काढण्यात येणार नसल्याचे आज स्पष्ट झाले असून मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत बस मधून वारी काढण्यासाठी मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात येणार आहे. आळंदी व देहू येथील प्रस्थान सोहळ्यास शंभर भाविकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे तर इतर आठ प्रस्थान सोहळ्यास पन्नास भाविकांच्या उपस्थितीतीची मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच मानाच्या दहा पालखी सोहळ्यास प्रत्येकी दोन अशा वीस बसेस पुरवण्यात येणार आहेत. तर पंढरपुरातील मुख्य मंदिर भाविकांना तसेच दर्शनासाठी बंद राहणार आहे. तसेच प्रत्येक सोहळ्यासोबत चाळीस वारकऱ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळेच यंदाही सामान्य वारकऱ्याला आपल्या घरूनच लाडक्या विठू माऊलीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
वारीची परंपराग टिकवण्यासाठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा मध्यम मार्ग काढण्यात आलेला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल आहे.