बारामती तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी दादासाहेब लोणकर तर सचिवपदी शहानूर शेख यांची बिनविरोध निवड.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तालुक्यातील ग्रामसेवक कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीत बिनविरोध कार्यकारणी जाहिर करण्यात आली.
बारामती ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी दादासाहेब लोणकर, उपाध्यक्षपदी बापू चव्हाण, तर सचिवपदी शहानूर शेख, तर महिला उपाध्यक्ष म्हणून वर्षा लोणकर जाधव, सहसचिव महादेव नगरे, कोषाध्यक्ष विनोद आटोळे, महिला सदस्या अनिषा खोमणे, रुपाली म्हेत्रे, कार्यकारणी सदस्य मोरेश्वर गाडे, सुनिल पवार आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवडीकामी विभागिय अध्यक्ष अमोल घोळवे, बारामती ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र आटोळे, कैलास कारंडे आदींचे यांचे सहकार्य मिळाले. याकामी निरीक्षक म्हणून सागर परदेशी, अमोल मिसाळ, रवि बनसोडे, आबा जगताप, सुनिल गायकवाड आदी इंदापूर तालुका कार्यकारणीने कामकाज पाहिले.
बारामती पंचायत समिती सभापती निता फरांदे व उपसभापती रोहीत कोकरे यांनी नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.