चौधरवाडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र शासन अंतर्गत वृक्षारोपण कर्यक्रम संपन्न.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथे मंगळवार दि २२ जून रोजी चौधरवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र शासन अंतर्गत एक हजार वृक्ष लागवड प्रकल्प व कृषी विभाग यांचे शेताच्या बांधावर व शेतजमिनीवर सलग फळबाग लागवड व वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे या होत्या त्यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कार्यालय परिसरात
सर्व प्रथम चिंच या झाडाचे वृक्षारोपण केले तर इतर पिंपळ ,लिंब,करंज, याही वृक्षांचे वृक्षारोपण सरपंच.अंजना चौधरी ,उपसरपंच.पांडुरंग दगडे तसेच ग्रामपंचायत सदस्य शोभा हेमंत शिंदे ,अनिता दगडे,
.विक्रम पवार,प्रदीप भापकर,माधुरी भापकर, वैशाली सुधीर भापकर,श्रीमती सोनल जगदाळे ग्रामसेवक, बाळासो सावंत ग्रामरोजगार सेवक,राजकुमार शिंदे पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष मोहन चौधरी,ग्रामस्थ म्हणून युवा नेते बाळासाहेब चौधरी,सोमनाथ देशमुख संदीपचौधरी,सुरेश पवार ,पोपट पवार,यादवराव लम्क्षिन शिंदे ,पत्रकार विनोद गोलांडे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे यांचा सत्कार सरपंच अंजना चौधरी यांनी केला तर आलेल्या इतर मान्यवरांचाही सत्कार ग्रामस्थ पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला.
कर्यक्रमाचे सूत्रसंचालन व आलेल्या मान्यवरांचे आभार शशांक पवार यांनी मानले.