Type Here to Get Search Results !

खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा - दतात्रय पडवळ

खरीप हंगामासाठी पीक विम्याची मुदत 15 जुलैपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा - दतात्रय पडवळ

बारामती प्रतिनिधी

खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2021 असून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी  दतात्रय पडवळ यांनी केले आहे.
योजनेची उद्दिष्टये : 1. नैसर्गिक आपत्ती , किड आणि रोगा सारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांचे नुकसान झाल्यास शतक-यांना विमा संरक्षण देणे 2. पीकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणै. 3. शेतक-यंना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुगी वापरण्यास प्रोत्साहन देणे. 4. कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पदनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पीकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत  वाढ हेतू साध्य होण्यास मदत होईल. 
योजनेची प्रमुख उद्दिष्टये : सदरची योजना ही अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पीकांसाठी असेल. 2. कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील केवळ अधिसूचित पीकांसाठी योजना ऐच्छिक आहे. 3. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पीकांसाठी  खातेदाराचे व्यतिरीक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. 4.या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी 70 टक्के जोखिमस्तर  निश्चित करण्यात आला आहे. 5. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतक-यावरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2.0 टक्के रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.  
जोखीम बाबी (Risk to be covered) : 1. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. 2. पीकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान. 3.पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग,वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ , पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्सकलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट. 4. स्थानिक,  नैसर्गिक आपत्ती  या बाबीअंतर्गत पिकांचे होणारे नुकसान. 5. नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान.
समाविष्ट पिके
तालुक्यात खरीप हंगाम 2021 मध्ये  बाजरी, भुईमूग, तूर सोयाबीन व कांदा पिकांचा समावेश करण्यात आला आहे.


पिकनिहाय हेक्टरी विमा हप्ता दर
बाजरी शेतकरी हिस्सा 440 रूपये, विमा संरक्षित रक्कम 22 हजार रूपये, भुईमूग शेतकरी हिस्सा 700 रूपये, विमा संरक्षित रक्कम 35 हजार रूपये, तूर 700 रूपये विमा संरक्षित रक्कम 35 हजार,  सोयाबीन 900 रूपये, विमा संरक्षित रक्कम 45 हजार रूपये,  कांदा 3250 रूपये विमा संरक्षित रक्कम 65 हजार  रूपये अशी आहे. 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची शाखा , राष्टीयकृत बँकेच्या शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायटया, कृषि खात्याचे कृषि सहायक व कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बारामती यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी विमा कंपनी- एचडीएफसी इर्गो इन्सुरन्स कंपनी, पुणे,  विमा कंपनी प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे- 9158733744 यांच्याशीही संपर्क साधावा. 
गर्दी टाळण्यासाठी अंतिम दिनांकाची वाट न पाहता त्यापुर्वी जास्तीत जास्त शेतक-यांनी पिक विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test