बारामतीतील सोमेश्वर कारखान्याला बदनाम करण्याचा डाव तर त्या नावे फेसबूक अकाउंट कडल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मध्ये असणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे एका अज्ञाताने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्या अकाउंट वरून कारखान्याची बदनामी केली जात असल्याचे लक्षात येताच या इसमाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कारखान्याचे कर्मचारी नितीन संजय यादव वय ३० वर्षे, व्यवसाय नोकरी रा. करंजेपुल ( ता. बारामती ) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरीस असलेल्या श्री सोमेश्वर सहाकारी साखर कारखान्याचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने " सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर" या नावाने अप्रमाणीकपणे कारखाण्याचे ओळखदर्शक नाव व फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले वगैरे मजकूराची फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन तर प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे हे करीत आहेत.