वाकी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर ;८४ रक्त बाटल्या संकलित.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामपंचायत वाकी व ग्रामस्थ तसेच श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था सोमेश्वर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि २६ रोजी भव्य रक्तदान शिबीर हनुमान मंदिर वाकी (ता बारामती) येथे सर्व कोरोनाचे नियम पळत आयोजन करण्यात आले होते.या कर्यांकमाचे उद्घाटन बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर , दक्षता कमिटी सदस्य व सरचिटणीस सुचिता साळवे ,पंचायत समिती सदस्य मेनका मगर यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सभापती नीता फरांदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाकी ग्रामस्थ व श्री सेवाभावी संस्था सोमेश्वर यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन व केक कापण्याचा कार्यक्रम प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर राष्ट्रवादी अध्यक्ष होळकर यांनी रक्तदात्यांना. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यानुसार सर्वांनी रक्तदान करावे व आपले मोलाचे योगदान हे नक्कीच गरिबांना मिळत ते श्रेष्ठदान होणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
या शिबिरास युवक व महिला तसेच विविध संघटनांनीही भाग मोठ्या स्वरूपात भाग नोंदवला होता यावेळी एकूण ८४ रक्त बाटल्यांचे संकलन झाले या रक्त बाटल्या मुक्ताई ब्लड सेंटर इंदापूर युनिटमध्ये संकलित करत सर्वच सेंटर टीमचे सत्कार आभार वाकी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला,
या प्रसंगी मा.बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल खलाटे ,सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर , नवनाथ उद्योग समूह अध्यक्ष संग्राम सोरटे,महाराष्ट्र सराफ असोसिएशन अध्यक्ष किरण आळंदीकर, वाकी सरपंच किसन बोडरे,उपसरपंच हनुमंत जगताप, पोलीस पाटील हनुमंत वि. जगताप ,ग्रामसेवक हांगे , तलाठी आर एन कोल्हे,वाकी राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी अध्यक्ष अनिल भंडलकर,श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे ,पत्रकार विनोद गोलांडे, ,ग्रा. पं.सदस्य वर्ष्याराणी जगताप, शालन जगताप, सुनीता जगताप, कल्पना जगताप, सुधीर गायकवाड, इंद्राजीत जगताप,हनुमान वि .सो. अध्यक्ष नितीन जगताप ,मा. व्हा. चेरमन बारामती दूधसंघ विलास जगताप,युवा कार्यकर्ते अक्षय गाडे,नितीन शेंडकर,पिंटू सावंत,करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे आधी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिलीप गाडे तर आभार उपसरपंच हनुमंत जगताप यांनी मानले.