सोमेश्वरच्या आजी-माजी सैनिक संघटनेने साजरा केला 'कारगिल विजय दिवस'
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
देशात आज 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. या 26 जुलै दिनानिमित्त तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वर नगर यांच्या वतीने प्रतिकात्मक प्रतिमेचे पूजन करत हा विजय दिन साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला.
या युद्धात शहीद जवानांना उपस्थित आजी-माजी सैनिक संघटनेतील सदस्यांनी अभिवादन केले.
बोलताना त्यावेळेस या कारगिल युद्धात जवानांच्या खांद्याला खांदा लावून युद्ध करणारे व आत्ता रिटायर असणारे अनिल रासकर यांनी घडलेल्या त्यावेळच्या घटनांना उजाळा देत ते पुढे म्हणाले की 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. या विजयाच्या कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे.
भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो.
'कारगिल विजय दिवस' साजरा करतावेळी
आजी माजी सैनिक संघटना माजी सैनिक संघटना अध्यक्ष अनिल शिंदे,कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, संघटना तक्रार कमिटी अध्यक्ष अँडो. गणेश आळंदीकर ,सदस्य अनिल रासकर , अशोक रासकर,ताराचंद शेंडकर, प्रशांत शेंडकर, बाळासाहेब गायकवाड , गणेश शेंडकर ,खंडू गडदरे, समीर इनामदार, पिसाळ सर सह पत्रकार विनोद गोलांडे उपस्थित होते.