वडगांव निंबाळकर पोलीसांचा छापा ;अवैध गावठी दारु विक्री प्रकरणी महीलेवर गुन्हा दाखल
मोरगाव प्रतिनिधी
चांदगुडेवाडी गावच्या हद्दीत चांदगुडेवाडी - मांगोबाचीवाडी रस्त्यालगत गावठी दारु विक्री सुरु असताना यावर वडगांव निंबाळकर पोलीसांनी आज छापा मारला . यामध्ये ३२ लिटर गावठी दारु बागळल्याप्रकरणी एका महीलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,चांदगुडेवाडी गावच्या हद्दीत ढवळे यांच्या घरा मागे चांदगुडेवाडी -मांगोबाचीवाडी रस्त्यालगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला गावठी दारु विक्री होत असल्याची माहीती वडगाव निंबाळकर पोलीसांना मिळाली . यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉनस्टेबल निता खलाटे व ईतर पोलीसांनी धाड मारली . यामाध्ये ३५ लिटर प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये ३२ लिटर दारु आढळून आली . याप्रकरणी सारीका जयकाल राठोड वय २१ वर्षे रा . मल्हार व्हिला अपार्टमेंटसमोर जेजुरी ता . पुरंदर जि . पुणे हिच्यावर अवैध दारु विक्री प्रकरणी मुंबई प्रोव्हीषन कायदा कलम ६५ ( ई ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .