उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसनिमित्त
"अक्षरज्ञान प्रतिष्ठान" मुर्टी संचलित "सह्याद्री ग्रुप" यांचा अनोख्या उपक्रम
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपला वाढदिवस साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला साद देत मुर्टी येथील अक्षरज्ञान प्रतिष्ठान संचलित सह्याद्री ग्रुप मुर्टी यांच्या संकल्पनेतून आणि लोकसहभागातून अनोख्या व विधायक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी गावची ग्रामदेवता सुमारे 205 वर्षापूर्वीचे ( स्थापन 1816) लक्ष्मीमाता मंदिराची स्वच्छता करून काटेरी झुडुपे काढण्यात आली. तसेच लक्ष्मीआई मंदिरासमोरील गावच्या साथीचा वेडा जाणारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. याशिवाय गावातील लक्ष्मीमाता मंदिराची डागडुजी करणे, रस्ता तयार करणे, मंदिराला पायऱ्या बनवणे, बाहेरील ओट्यावर सिमेंट कोबा करणे, मंदिराला रंगरंगोटी करणे, लाईटची व्यवस्था करणे, तसेच पूर्ण मंदिर परिसराला कंपाउंड करून वृक्ष लावणे आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था, सुरक्षेच्या माध्यमातून सीसीटीव्ही, लावण्यात येणार आहे. तसेच सदर मंदिर व्यवस्थेची कायमस्वरूपी जबाबदारी घेतली आहे.
अक्षरज्ञान प्रतिष्ठान मुर्टी संचलित सह्याद्री ग्रुप यांचे या अनोख्या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.