शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय
येथील रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
बारामती प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय येथे झालेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी एकूण 157 रक्त बाटल्या संकलित झाल्या.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन विधानसभा सदस्य तथा अभ्यागतमंडळ सदस्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय, बारामती दिपक चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. चंद्रकांत म्हस्के तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील अधिकारी , कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या रक्तदान शिबीराचे नियोजन महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जाधव यांनी केले. तसेच महिला शासकीय ग्रामीण रूग्णालय, बारामती येथील रूग्णांना बारामती नगरपरिषेदेच्या नगरसेविका सौ. सुरेखाताई चौधर व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग चौधर यांच्या हस्ते फळेवाटपाचा कार्यक्रम पार पडला.