Type Here to Get Search Results !

शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण गरजेचे – मदने

शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण गरजेचे – मदने
पुरंदर प्रतिनिधी

एकिकडे कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मायबाप सरकार सातत्याने प्रयत्नशील असताना पशुधनावर देखील मोठ्या प्रमाणात साथीचे आजार बळावताना दिसत  आहेत .अशा आजारांचे त्वरित निदान करून संबंधित प्रशासनाने प्रामुख्याने शेळ्या मेंढ्यांचे त्वरित लसीकरण करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुका सरचिटणीस दादासाहेब मदने यांनी व्यक्त केले.
वाल्हे येथील पत्रकारांशी चर्चा करताना दादासाहेब मदने यांनी धनगर समाजाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.ते पुढे म्हणाले पावसाळ्यात शेळ्या मेंढ्या घोडी व पाळीव कुत्री यांना प्रामुख्याने साथीचे आजार बळावतात.
त्यावर उपचार होईपर्यंत अनेक शेळ्या मेंढ्या व अन्य पशुधन देखील दगावते.त्यामुळे मेंढपाळांचे अतोनात नुकसान होते. यासाठी पशुसंवर्धन विभागाने सतर्क राहून तातडीने निर्णय घ्यावा तसेच  मेंढपाळांचे  हित जपण्याहेतू  शेळ्या मेंढ्या व इतर पाळीव जनावरांसाठी रोग प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून संबंधित प्रशासनाने थेट धनगरांच्या वाड्यावर जाऊन लसीकरण करावे अशी आग्रही मागणी देखील दादासाहेब मदने यांनी केली.
याप्रसंगी महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प.अशोक महाराज पवार सामाजिक कार्यकर्ते नाना दाते तसेच विठ्ठल बरकडे ,शिवाजी मदने, राघू मदने, बबन मदने, नारायण बरकडे ,दशरथ मदने आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test