बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वसंत मोरे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोनगाव (ता.बारामती) येथील सोनेश्वर मंदीराच्या परिसरात पत्रकार संघटनेची वार्षिक बैठक पार पडली. यामध्ये खालीलप्रमाणे निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वसंतराव मोरे यांची तर उपाध्यक्षपदी कल्याणराव पाचांगणे, युवराज खोमणे, सचिवपदी चिंतामणी क्षीरसागर व खजिनदारपदी सुदाम नेवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार माणिकराव दांगडे पाटील, दत्ता माळशिकारे, ऍड. गणेश आळंदीकर, महेश जगताप,अशोक वेदपाठक, संतोष शेंडकर, राजेंद्र गलांडे, अमोल यादव, काशिनाथ पिंगळे, विनोद गोलांडे तुषार धुमाळ, मनोहर तावरे, विजय गोलांडे, विनोद पवार, हेमंत गडकरी, सुदाम नेवसे, सोमनाथ भिले, मंगेश कचरे, गजानन हगवणे, सचिन वाघ, सोमनाथ लोणकर, अमर वाघ, यांच्यासह संघातील सर्व सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष वसंत मोरे म्हणाले की, येणाऱ्या काळात संघातील सर्व सदस्यांना एकत्र घेवून संघाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे तसेच पत्रकारांच्या विविध समस्या शासन दरबारी पोहोचवून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.