त्या...हॉटेल मालकाच्या डोक्यात सतूर मारत फरार आरोपी चाकण मधून अटक; वडगांव पोलिसांची कारवाई.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सोरटेवाडी गावचे हद्दीत मुक्ताई हॉटेल वर जेवणाचे पार्सल घेतल्यावर पैसे देण्याचे कारणावरून 4 इसमानी हॉटेलं मालकाच्या डोक्यात सतूर मारून गंभीर दुखापत करून पळून गेले होते, ही घटना शुक्रवारी दि.2/7/2021 रोजी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गुरनं 242/2021 भादवि कलम 307,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल होता, या गुन्ह्यामध्ये 1)रणजित कैलास भंडलकर रा खामगाव , 2)वैभव हनुमंत चव्हाण रा खामगाव ता फलटण जि सातारा यांना अटक केली होती, व सदर गुन्ह्या मधील फरारी आरोपी सोमनाथ हनुमंत पवार वय 25 वर्ष रा. खामगाव ता फलटण जि. सातारा याला गोपनीय माहितीच्या आधारे चाकण येथील नाणेकर वाडी (ता खेड ) येथुन अटक केली आहे सदर आरोपी गुन्हा मध्ये फरार होता.
तसेच त्याचेवर यापूर्वी फलटण ग्रामीण पो स्टे, लोणंद पो स्टे, जेजुरी पो स्टे, चाकण पो स्टे, वडगाव निंबाळकर पो स्टे येथे दरोडा, जबरी चोरी, चोरी, खुनाचा प्रयत्न अशे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलींद मोहिते सो उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शना खाली तर वडगाव निंबाळकर पोलीस चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पो.ना.मनेरी, पो.शि. सलमान खान, पो.शि. पोपट नाळे, पो. शि.अमोल भुजबळ यांनी कामगिरी केली आहे...