मकृषिकन्या यांचे तांदुळवाडी बारामती येथील शेतकऱ्यांना लाभणार मार्गदर्शन.
बारामती : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय भानस हिवरे नेवासा येथील अंतिम वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी मोहिते श्रुती किरण यांचे बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावांमध्ये आगमन झाले.
यावेळी नगरसेविका ज्योती भारत सरोदे, सरपंच जय दादा पाटील व तसेच ग्रामस्थ चंद्रकांत यादव, रवींद्र सरोदे ,ऋत्विक सरोदे, राजेंद्र सरोदे ,तन्मय सरोदे, पंकज सरोदे ,कल्पना सरोदे, सायली सरोदे ,प्रशांत इंदुलकर, बापू गायकवाड ,बापू यमगर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
श्रुती मोहिते ही अंतिम वर्षातील विद्यार्थिनी असून ग्रामीण कृषी कार्यक्रम ,कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत प्राचार्य डॉ.अतुल दरंदले कार्यक्रम मार्गदर्शक प्रा.एम आर माने प्रा.गाजरे तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पीक लागवड शेती पद्धती आधुनिक शेतीची माहिती बळीराजा वित्तीय पुरवठा करणारी सहकारी वित्त संस्थांची कार्यक्रम पद्धतीत पीक प्रात्यक्षिके तसेच इतर शेती संबंधी माहिती गोळा करणार असून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे.