Type Here to Get Search Results !

चुलत दिराकडूनच भावजयची छेडछाड, घरातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी,वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Top Post Ad

चुलत दिराकडूनच भावजयची छेडछाड, घरातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी,वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


घरातीलच असणाऱ्या चुलत भावाची बायको जेवण केलेली भांडी घराच्या बाहेर घासत असताना चुलत दिराने तिला पाठीमागून मिठी मारली.  तिचा आवाज ऐकून घरातील बाहेर आले असता त्यांना दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकारची वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.   

        याबाबत मोरगाव येथील एका ३९ वर्ष महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी सुनिल चंदर लव्हटे, रा. मोरगाव ता. बारामती जि पुणे सध्या रा. पणवेल नवी मुंबई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे घरासमोर जेवन केलेली भांडी घासत असताना घरासमोर फिर्यादीचे चुलत दिर सुनिल चंदर लव्हटे, हे आले व फिर्यादीस म्हणाले की,” कुठे गेला भाडखाऊ, त्याचेकडे बघतोच “ असे म्हणुन शिवीगाळ करुन जवळ येवुन त्याने  फिर्यादीस पाठीमागुन मिठठी मारली. त्यामुळे  फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यावेळी  फिर्यादी ओरडली असता फिर्यादीचे घरामध्ये झोपलेले सासु सासरे हे बाहेर आले त्यावेळी त्यांना त्याने शिवीगाळ दमदाटी करुन जिवे मारणेची धमकी देवुन तो निघुन गेला आहे
             फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो.हवा.मोहीते  हे करीत आहेत.

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.