सुनिल भगवान जोशी(सर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोशीवाडी यांची पदोन्नतीने प्रमोशन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पुणे येथे त्यांचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थित सायन्स पदवीधर म्हणून सुनील जोशी यांचे प्रमोशन करण्यात आले.
जोशी सरांनी जोशीवाडी(ता बारामती) येथे त्यांनी 2004 साली अल्प मानधनात वस्तीशाळा सुरू केली.जोशीवाडी, रासकरमळा येथे शाळेची सोय नसल्याने मुलांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जावे लागायचे.मुले शाळेत जायला कंटाळा करत .परंतु ही शाळा सुरू झाल्याने सर्व मुले शाळेत येऊ लागले.पुढे येथेच अंगणवाडी सुरू केली व लहान मुलांची देखील सोय झाली.प्रथम त्यांनी घरात,झाडाखाली, देवळात शाळा भरवली.त्यांचे काम चांगले असल्याने पट वाढत गेला पुढे2008-09 शाळेचे रूपांतर जिल्हा परिषद शाळेत झाले व तेथे शाळेची इमारत झाली.त्यांचे काम चांगले असल्याने पंचायत समिती बारामती ने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" दिला तसेच तालुका समन्वयक=बालरक्षक* म्हणून नेमणूक ही झाली. नुकताच त्यांना श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थने कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .त्यांनी या शाळेत 16 वर्षे सेवा केली.त्यांचे अनेक विध्यार्थी Diploma, B.sc.,ITI झाले.त्यांचे 90% विध्यार्थी नोकरीला आहेत तशेच काही स्वतःचा व्यवसाय सांभाळतात.त्यांनी ग्रामीण भागातील शाळेचा कायापालट केला.जोशी यांची शैक्षणिक पात्रता B.sc. M.A. Ded.Bed व काम चांगले असल्याने त्यांची पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी पदोन्नतीने प्रमोशन केले.
जोशी सरांनी शून्यातून शाळेची सुरवात करून आज या पदापर्यंत पोहोचले. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला निश्चित चांगले फळ मिळते .त्यांनी जोशीवाडी, रासकरमळा ग्रामस्थांनी जी साथ दिली त्यामुळेच या ठिकाणी शाळा झाली असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले व सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
त्यांना जोशीवाडी, रासकरमळा ग्रामस्थांच्या वतीने पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. भविष्यात त्यांना केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी पदी संधी मिळो असे सोमेश्वरनगर केंद्रातील शिक्षकांनी मत व्यक्त केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.