पुणे ते सिद्धटेक लालपरी सोमवार पासून पुन्हा एकदा प्रवाश्यांच्या सेवेसाठी
देऊलगावराजे प्रतिनिधी 10 जुले 2021 पुणे जिल्हा त मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना व्हायरस वाढ होत असल्यामुळे एसटी महामंडळाच्या वतीने पुणे ते सिद्धटेकमुककमी एसटी बंद करण्यात आली होती ती एसटी परत पूर्व प्रमाणे सुरू करण्यात यावी अशी मागणी शिरापूर चे माजी सरपंच केशव काळे यांनी वेळोवेळी दौंड एसटी डेपो यांचे केली होती त्यानुसार आज दौंड एस टी डेपोचे मुख्याधिकारी रामनाथ मगर यांनी शिरापूर ग्रामपंचायतला आज भेट दिली यामध्ये पुन्हा एस टी सुरू करणे व आपल्या तालुक्यातील डेपोला सहकार्य करावे अशी चर्चा सरपंच सुनंदा फाळके उपसरपंच प्रविण सातव, प्रशांत साळुंके , मारूती होलम,. भीमराव गायकवाड, .राजू खुडे .दिलीप डाळिंबे , भरत डाळिंबे यांचा सोबत करण्यात आली तसेच पुणे ते सिद्धटेक ही मुककमी लालपरी सोमवार पासून सुरू करण्यात येणार आहे असे मगर यांनी सांगितले