कत्तलीसाठी दोन गाईंची खरेदी करणाऱ्या कसायांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती प्रतिनिधी
कत्तलीसाठी २४ हजार रुपयांच्या दोन गायींची खरेदी केल्याप्रकरणी बारामतीतील दोन कसायांविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुफरीन कुरेशी व शाहनवाज कुरेशी (पूर्ण) नावे नाहीत, रा. बारामती) या दोघांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी बाळासाहेब पानसरे यांनी याबाबत फिर्याद दिली. का-हाटी (ता. बारामती) येथे गुरुवारी (दि. ८) रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली.
अधिक माहितीनुसार, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे सदस्य शिवशंकर स्वामी यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांना माहिती दिली. त्यानुसार लांडे यांनी उपनिरीक्षक योगेश शेलार, ज्ञानेश्वर सानप, पानसरे, संतोष जावीर, महिला पोलिस खेडकर यांना याबाबत कारवाई करण्यास सांगितले. पोलिसांनी का-हाटी येथे जात मध्यस्थ रामदास भगवान भंडलकर याच्याकडे चौकशी केली. त्याने गुफरीन व शाहनवाज कुरेशी यांना कत्तलीसाठी देण्यासाठी माझ्या मध्यस्थाने नवनाथ चांदगुडे (रा. का-हाटी) व नंदू काटे (रा. कोळोली) यांच्याकडून गायी घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी या कारवाईत २४ हजार रुपयांच्या दोन गायी ताब्यात घेतल्या.
गुरुवारच्या रात्रीच त्या बारामती येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार होत्या.