" रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी" च्या अध्यक्षपदी सचिन खोले.
बारामती प्रतिनिधी
रोटरी वर्ष २०२१-२२ साठीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांचा पद्ग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी ही संस्था गेली अनेक वर्षे पवना नदी संवर्धन, निसर्ग, पर्यावरण आणि जल संवर्धन या विषयावर काम करत असून अध्यक्ष पदी सचिन खोले आणि सचिव पदी वनिता सावंत यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून . पंकज शहा, डिस्ट्रिक गव्हर्नर डिस्ट्रिक्ट ३१३१ तसेच AG बलवीर चावला आणि AGA सत्यजित उंब्रजकर उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष सचिन खोले यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी येणाऱ्या काळात समाजाच्या उन्नतीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करणार असून पवना नदी स्वच्छता अभियाना सोबतच प्लास्टिक मुक्ती, प्रदूषण मुक्ती, ट्राफिक मुक्ती, हॅपी व्हिलेज, निराधार आणि वंचितांसाठी मेडिकल प्रोजेक्ट आणि मेंबरशिप डेवलपमेंट अशा विविध उपक्रमावर भर देणार असल्याचे सांगितले.
संचालक मंडळात प्रदीप वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, सचिन काळभोर, सोमनाथ हरपुडे, प्रणाली हरपुडे, स्वाती प्रदीप वाल्हेकर, गणेश बोरा, रुपेश मुनोत, वसंत ढवळे, संतोष वाघ, सदाशिव जाधव, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, सुभाष वाल्हेकर, रोहन वाल्हेकर, अतुल क्षिरसागर, प्राजक्ता रुद्रवार, स्वाती सुनील वाल्हेकर, डॉ. मोहन पवार, निलेश मरळ, सुधीर मरळ, जाकीर हुसेन चौधरी, रामेश्वर पवार यांचा समावेश आहे.
फंड रेझिंग डायरेक्टर सचिन काळभोर यांनी सूत्रसंचालन केले आणि संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी सर्वांचे आभार मानले.