Type Here to Get Search Results !

माऊलीचे शाही 'नीरा स्नान' बघण्यास भक्त व वारकरी यंंदाही मुकले......

माऊलीचे शाही 'नीरा स्नान'  बघण्यास भक्त व वारकरी यंंदाही  मुकले......
यंदावर्षी ही  नीरा नदी काठ वैष्णवांच्याा मेळ्याविनाच

संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर माऊलींंचा पालखी सोहळा हा शेकडो वर्ष्यापासून   दरवर्षी  पांडुरंगाच्या भेटीस टाळ मृदंगाच्या गजरात हरीनामाचा जयघोष करीत  पायीवारीने जात असतो. माञ गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे याही वर्षी नीरा येथील येथील नदी काठ व माऊलींच्या नीरा स्नानाचा दत्तघाट परिसरही वारक-यांविना सुुुन..सुना.. दिसत होता. त्यामुळे माऊलींचे नीरेेेतील  शाही 'नीरा स्नान'  बघण्यास यंंदाही लाखो वारकरी मुकले..
    
 परंंपरेनुसार दरवर्षी माऊलींची पायी वारी जेष्ठ कृ.८ ला आळंदीहून निघाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील वाल्हा नगरीचा तसेच पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून जेष्ठ अमावस्येला पुरंदर तालुक्यातील नीरा नदी काठावर असलेल्या पालखी तळावर  विसावत असतो. तसेच नीरा व परिसरातील नागरिक, भाविक माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज होऊन माऊलींचे जोरदार स्वागत करीत असतात. त्यामुळे नीरा गावांसह संपुर्ण नीरा नदी काठी 
लाखो वैष्णवांचा मेळा भरलेला पहायला मिळत असतो. परंतू कोरोना संसर्गामुळे यंदाही माऊलींच्या पालखी सोहळ्यासह पायी वारी रद्द झाल्याने वारक-यांसह भाविकांमध्ये निरूत्साह दिसत होता.

             यावर्षी जेष्ठ अमावस्या अर्थात शुक्रवारी (दि.९) माऊलींचा पालखी सोहळा नीरा नदी काठावर विसावला असता व संपुर्ण नीरा नदीकाठी वारक-यांची मंदियाळी पहावयास मिळाली असती.  दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा पुणे  जिल्ह्याचा निरोप घेऊन नीरा नदीवरील  निसर्गरम्य अशा जुन्या ब्रिटिश कालीन पुलावरून सातारा जिल्ह्यातील पाडेगांव ता.खंडाळा च्या हद्दीत प्रवेश करीत असताना 

                नीरा भिवरा पडता दृष्टी |
                स्नान करिता शुद्धी सृष्टी ||
                अंती तो वैकुंठ प्राप्ती|
                ऐसे परमेहि बोलिला ||

                  या अभंगाप्रमाणे माऊलींच्या पादुका रथातून उतरवून सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात देण्यात येतात.
पालखी सोहळा प्रमुख ,आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त     चोपदार व लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत   'माऊली - माऊली 'नामाच्या जयघोषात नदीकाठावरील निसर्गरम्य दत्तघाटावर भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पादुकांना 
नीरा नदीच्या पविञ तीर्थांनी  स्नान घालण्यात येते. हा क्षण आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी हजारो वारक-यांची   दत्तघाटावर व नदीपुलावर गर्दी करीत असतात. त्यानंतर पालखी सोहळ्यातील प्रवासाचा  अर्धा टप्पा नीरा येथे पुर्ण होत असतो. त्यानंतर पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन नीरा स्नानानंतर   दुपारी २.१५ च्या सुमारास सोहळा  शुरवीरांच्या  भुमित सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत असतो.
परंतू शासनाने कोरोनाच्या संकटामुळे पायी वारीवर निर्बंध आणल्याने सर्वञ सन्नाटा दिसत होता.
-------------------------------------------------------------------पुणे जिल्ह्याचा माऊलींना निरोप डोळ्यात 
टिपण्यासारखा 

माऊलींच्या पालखी सोहळ्यास पुणे जिल्ह्याच्या सिमेवर 
पुण्याचे जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी,तहसिलदार, 
पुणे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक, पुरंदर-भोरचे  पोलिस उपअधिक्षक , जेजुरी पोलिस स्टेशनचे अधिकारी व लोकप्रतिनिधी 
माऊलींना निरोप देत असतात तर सातारा जिल्ह्यातील प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी , पालकमंञी, खासदार, आमदार तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी ही जिल्हात 
मोठ्या भक्तिमय वातावरणात जोरदार स्वागत करीत असतात.  हा प्रसंग राज्यभरातून आलेले लाखो वारक-यांसह भाविक पहात असतात
-------------------------------------------------------------------
यावर्षी माऊलींचे  'नीरा स्नान' झाले आळंदीतच .......

गुरूवारी (दि.८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास
परंपरेनुसार पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर,  बाळासाहेब चोपदार यांच्या उपस्थितीत नीरा येथील पविञ तीर्थाचे प्रथेप्रमाणे पुजन केले. त्यानंतर नीरेचे पविञ तीर्थ  चांदीच्या घागरीत घेऊन ते आळंदीला आणण्यात आले. शुक्रवारी (दि.९) सकाळी साडे सहा वाजता माऊलींच्या पादुकांना दुधाचा अभिषेक घातल्यानंतर माऊलींच्या पादुकांना 
मी व सोहळा मालकांनी ' नीरा स्नान'  घातले.


               -----   योगेश देसाई ,
          विश्वस्त, श्री.संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी,                              आळदी.

          परंपरेनुसार  माऊलींच्या पादुकांना जेष्ठ अमावस्येला नीरा येथील दुपारच्या विसाव्यानंतर नीरा नदीच्या दत्तघाटावर 'नीरा स्नान'  घालण्याची प्रथा आहे. परंतू  गत वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी रद्द झाल्याने दरवर्षी लाखो वारक-यांच्या  उपस्थित माऊलींना घालण्यात येणारे नीरा स्नान यावर्षीही नीरा नदीच्या प्रसिद्व दत्तघाटावर झाले नसल्याने  दरवर्षी गजबजलेले दत्तघाट व परिसर यंदाही  वारक-यांविना अभावी आत्ता तेथे शुकशुकाट..दिसत होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test