निवृत्त मुख्याध्यापक व माजी सरपंच दिनकर थोरात यांचे दुखद निधन
बारामती: प्रतिनिधी
पिंपळी ता.बारामती येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनकर शंकर थोरात यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने १२जुलै रोजी दुःखद निधन झाले.
शिस्तप्रिय शिक्षक ते मुख्याध्यापक अशी त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. तसेच लोकप्रिय व कर्तबगार पिंपळी गावचे सरपंच म्हणून त्यांची ख्याती होती. आंबेडकर चळवळीतील व बौद्ध धम्म प्रसारक म्हणून देखील त्यांची ओळख होती.
त्यांचे मागे २ विवाहित मुले व १ विवाहित मुलगी व उच्चशिक्षित नातवंडे आहेत.
थोरली मुलगी मुंबई याठिकाणी एम.बी.बी.एस डॉक्टर आहे. दोन नंबरचा मुलगा बारामती माळेगाव येथील शासकीय कौशल्य संस्थेत शिक्षक आहे तर तीन नंबरचा मुलगा रत्नागिरी कोकण विभागात तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत. अशा प्रकारे त्यांनी स्वतःचा परिवार उच्च शिक्षित केला असून समाजातील आणि पंचक्रोशीतील अनेक युवक घडवले आहेत. त्यांना वाचनाची खूप आवड होती,सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावात सार्वजनिक वाचनालय,चावडी सभागृह, व्यायाम शाळेसह घरकूल योजना अनेक लोकूपयोगी उपक्रम राबविले आहेत.
त्यांचे जाण्याने थोरात परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
शोकाकुल थोरात परिवार व पिंपळी लिमटेक ग्रामस्थ