वाल्हे नगरीत काँग्रेस तर्फे सन्मान सोहळा...
पुरंदर प्रतिनिधी
सर्व सामान्य जनतेच्या विकासासाठी कॉंग्रेस पक्ष हा कायमच कटिबद्ध राहिला असून शासकीय समित्यांवर काम करणाऱ्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील जनतेची सेवा हाच विचार घेऊन काम करणे तितकेच जरुरी असल्याचे मत बेलसर माळशिरस गटाचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरुंगे यांनी व्यक्त केले.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे येथील महर्षी वाल्मिकींच्या समाधीस्थळी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विविध शासकीय समित्यांवर काम करणाऱ्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता .यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणातून झुरुंगे हे बोलत होते .
या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा सुनिता कोलते तसेच सदस्य वैशाली निगडे ,एकात्मिक पुनर्विलोकन समितीचे सदस्य अॅड . विजय भालेराव विद्युत वितरण समितीचे सदस्य संभाजी काळाणे कल्याण जेधे यांसह जिल्हा युवक कॉंग्रसचे उपाध्यक्ष सागर मोकाशी तालुकाध्यक्ष माउली यादव तसेच प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र बरकडे नीरा गावचे उपसरपंच राजेश काकडे पत्रकार गोरख मेमाणे आदी मान्यवरांचा दत्तात्रेय झुरुंगे यांच्या हस्ते फुलझाडे व श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी विकास पवार, मोहनराव ढोबळे, संदिप पवार, इकबाल आतार, दत्तात्रेय शिंदे ,पिसुर्टीचे सरपंच संजय चोरमले ,दादासाहेब म्हेत्रे ,गणेश थोपटे, राजाभाऊ पवार, सुनील कदम, प्रकाश पवार, गुलाब कुमठेकर ,राहुल पवार, बाबू मदने ,विकास इंदलकर ,अतुल पवार संतोष तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन दुर्गाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण कुमठेकर यांनी मानले.