मोरगाव प्रतिनिधी
बारामती तालुक्यात खरीप हंगामातील पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते . कृषी विभागाचे यंदाचे २५ हजार हेक्टरवर पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे . या हंगामात युरीयाची मागणी अधीक असुन गेल्या १६ जुन पासून २७०० मेट्रीक ट्न युरीयाची आवक तालुक्यात करण्यात आली असल्याची माहीती बारामती तालुका कृषी अधीकारी दत्तात्रय पडवळ यांनी दिली .
गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी तालुक्यातील पणदरे ,माळेगाव , मोरगाव , सोमेश्र्वरनगर , सुपा , जळगाव , उंडवडी , तरडोली , मुर्टी , आदी परीसरात खरीपाची मोठ्या पेरणी होत आहे . बागायती भागात आडसाली ऊस व मका तर पश्चिम भागात कांदा , बाजरी , सूर्यफूल , ऊस , मुग , मटकी , सोयाबिन आदी पिक घेतली जातात . या सर्व पिकांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून युरीयाची मागणी जास्त प्रमाणात वाढु लागली आहे . बागायती पट्ट्याच्या मानाने जिरायती भागात खत विक्रीची दुकाने कमी असल्याने उपलब्ध साठा व मागणी यांचा अद्याप तरी मेळ बसला नसल्याने युरीया खरेदीसाठी सकाळपासून रांगा लागत आहेत .
गेल्या महीन्यातील १६ जुन पासून आज अखेरपर्यंत खाजगी व सहकारी दुकानांत २७०० मेट्रीक ट्न युरीयाची आवक झाली आहे . शेतकऱ्यांना सम प्रमाणात वाट्प होण्यासाठी एका आधारवर एक युरीया गोणी देण्यात येत असल्याची माहीती कृषी विभागाकडून करण्यात आली. पुढील सात दिवसांत पुरवठा आणखी सुरळीत होणार आहे मात्र शेतकऱ्यांनी अतीरीक्त रासायनिक खतांचा वापर टाळावा असे आवाहन तालुका कृषी अधीकाऱ्यांकडुन करण्यात येत आहे .