पिंपळीत वसंतराव नाईक जयंती निमित्त कृषिदिन व कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम संपन्न
बारामती प्रतिनिधी
१ जुलै रोजी कै.वसंतराव नाईक जयंती कृषिदिन व कृषी संजीवनी मोहीम २०२१ समारोप कार्यक्रम पिंपळी ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ऊस शास्त्रज्ञ संशोधन केंद्र पाडेगाव डॉ.थोरवे यांनी ऊस उत्पादकता वाढीसाठी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ सरपंच मंगल हरीभाऊ केसकर यांचे हस्ते कै.वसंतराव नाईक यांचे प्रतिमेचे पुंजन करून व कृषिदिन व कृषी संजीवनी हा कार्यक्रम वृक्षारोप लावून करण्यात आला.
तसेच कृषिदूत कु.दिव्या ढवाण पाटील यांनी देखील पीक व ऊस संवर्धन विषयी माहिती दिली. ऊस वाढीसाठी व भरघोस उत्पन्न वाढीसाठी खतांची मात्रा,बियाणे कोणते व कसे वापरावे,मृदा संवर्धन आदी विषयांची सविस्तरपणे माहिती दिली.
त्याचप्रमाणे कै.आप्पाजी द्वारकोजी मदने यांच्या स्मरणार्थ फलोत्पादन संघ पिंपळी चे संचालक उत्तम मदने यांच्या वतीने पिंपळी-लिमटेक गावातील जो शेतकरी सर्वाधिक ऊस उत्पादित करेल त्यांचे करिता प्रथम क्रमांक एकतीस हजार, द्वितीय क्रमांक एकवीस हजार व तृतीय क्रमांक आकरा हजार रुपये तसेच विविध विकास सोसायटीचे संचालक अशोक देवकाते यांचे वतीने उत्तेजनार्थ व सहभागी शेतकरी यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे.
यावेळी कृषी मंडळ अधिकारी बारामती मासाळ, कृषिपर्यवेक्षक कुंभार, गोलांडे, सर्व कृषिसहाय्यक ,सरपंच मंगल केसकर केसकर,उपसरपंच राहुल बनकर, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात, आबासाहेब देवकाते,उमेश पिसाळ सदस्या स्वाती ढवाण,अश्विनी बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, तलाठी तेजस्वी मोरे,श्रीराम सोसायटीचे चेअरमन रमेशराव ढवाण,शेतकरी हरिभाऊ केसकर,रमेश देवकाते,महेश चौधरी,प्रदीप यादव,आनंदराव देवकाते,अमोल देवकाते, नितीन देवकाते,जयवंत केसकर,उत्तम ठेंगल,राजेंद्र चौधरी,दत्तात्रय तांबे आदींसह प्रगतशील बागायतदार शेतकरी उपस्थित होते.