वडगाव निंबाऴकर पोलिसांची करवाई;मल्हारराज हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
वडगाव निंबाऴकर पोलीस स्टेशन गुर नं 249/2021 भा.द.वि कलम 452,143,147,149,324,269,270,427,323,504,506 मु.पो.का.क 135
1)फिर्यादी- स्वप्नील राजेंद्र गायकवाड वय 29 धंदा मॅनेजर( मल्हारराज हाँटेल का-हाटी) रा. मुळ पळसमंडळ ता.माळषिरस जि.सोलापुर हल्ली रा. मल्हारराज हाँटेल काÚहाटी ता.बारामती जि.पुणे मो.नं 9356785384
2)आऱोपी- 1) इंद्रजित सोनवणे पुर्ण नाव माहीत नाही. रा. क-हावागज ता.बारामती जि.पुणे 2) नितीन खोमणे पुर्ण नाव माहीत नाही.रा. जळगाव क.प ता.बारामती जि.पुणे व इतर 10 जण
3)गु.घ.ता.वेळ.ठिकाण-ता.03/07/2021 रोजी रात्रौ 20.45 वाजता च्या सुमारास मल्हारराज हाँटेल, का-हाटी,ता.बारामती जि.पुणे
4)गु.दा.ता.वेळ -दिनांक 4/7/2021 रोजी स्टे.डा.नं.19/21 वेळ 16.12
5) हकीकत -वर नमुद केले ता.वेऴी व ठिकाणी यातील आरोपी नं 2 हा त्यांचे समवेत इतर 4 लोकांना सोबत घेवुन सायंकाळी 18.45 वा चे सुमारास फिर्यादीचे
मल्हारराज हाँटेलमध्ये आला त्यावेळी हाँटेलमध्ये वेटरचे काम करणारा कुमारपाल यास आम्हाला हाँटेलमध्ये बसु द्या असे आरोपी नं 2 व त्याचे सोबत असणारे 4 लोक वेटर कुमारपाल यास म्हणाले असता त्यावर कुमारपाल याने आम्ही हाँटेलमध्ये जेवायला बसुन देत नाही तुम्हाला जेवन पार्सल घेवुन जा असे म्हणाला असता आरोपी नं 2 व त्याचे सोबत आलेल्या लोकांना म्हणाल्यानंतर त्यांनी कुमारपाल यास शिवीगाळ दमदाटी करून माझे नाव नितीन खोमणे असुन मी इथलाच राहणारा आहे मी तुमच्याकडे बघुन घेतो असे म्हणुन तेथुन निघुन गेले नंतर आरोपी नं 1 व 2 यांनी रात्रो 20.45 वा चे सुमारास आपल्या सोबत 10 लोकांना घेवुन येवुन हाँटेलचे मेन गेटवरून उड्या मारून हाँटेलमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादीस तसेच वेटर कुमारपाल यास हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून हाँटेलमध्ये असना-या कोल्ड्रींगसच्या बाटल्या तसेच खुर्ची ने मारहाण करून सी.सी.टी.व्ही.कँमेरेची स्क्रीन फिर्यादीचे डोक्यात फोडुन तसेच वेटर कुमारपाल यास कोल्ड्रींगसच्या बाटली डोक्यात मारून दुखापत करून हाँटेलमध्ये असणा-या खुर्चा तसेच हाँलची काच व खिडक्यांची काच याच्यावर कोल्ड्रींगसच्या बाटल्या व खुर्चा फेकुन मारून नुकसान केले .वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हायाचा प्रथमवर्ग रिपोर्ट मा.जे.एम.एफ .सी सो,कोर्ट बारामती याच्या कोर्टात रवाना केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस पाटमास करीत आहेत.