करंजे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बाळासाहेब शिंदे यांची निवड..
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे ग्रामपंचायतची उपसरपंच निवड नुकतीच सरपंच जया संताजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दि २३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली त्यावेळी सर्वानुमते बाळासाहेब सोमा शिंदे यांची एक मताने बिनविरोध निवड झाली , माजी उपसरपंच कैलास गायकवाड यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने व रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर शिंदे यांची निवड करण्यात आली,
या प्रसंगी ग्रामसेवक चंद्रशेखर काळभोर , मा सरपंच संताजी गायकवाड, तंटामुक्ती प्रताप गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य सदस्य. अतुल गायकवाड, मयुरी गायकवाड, कैलास गायकवाड, राजश्री गायकवाड, कालिदास सावंत, सोनाबाई पवार, नंदा फरांदे, रेश्मा मुलाणी,कर्मचारी अमोल गायकवाड, शंकर सावंत इतर मान्यवर उपस्थित होते.
निवडी नंतर मान्यवरांचे आभार मानत मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेन सर्वांना सोबत घेत गावचा विकास जास्तीत ज्यास्त कसा करता येईल याचा मी नक्की प्रयत्न करेन असे शिंदे यांनी बोलताना सांगितले.