अजिंक्य टेकवडे युवा मंचाचे कार्य कौतुकास्पद – दुर्गाडे
पुरंदर प्रतिनिधी
ऑन लाईन शिक्षणासाठी मोबाईल तथा इतर सुविधा उपलब्ध होत नसल्याने येथील अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणा पासून वंचित राहण्याची वेळ आली होती परंतु त्यांची अडचण लक्षात घेऊनच त्यानां ब्रिज कोर्स च्या पुस्तकांचे वितरण करणाऱ्या अजिंक्य टेकवडे युवा मंचाचे कार्य खरोखर कौतुकास्पद असल्याचे मत प्रा.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
दौंडज येथील डॉ.पतंगराव कदम विद्यालयात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अजिंक्य टेकवडे युवा मंच च्या वतीने शालेय विद्यार्थांना मोफत ब्रिज कोर्स पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात दुर्गाडे हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले कोरोना काळात अपंगांना किराणा कीट तसेच ठिकठिकाणी नेत्र तपासणी शिबीर व नेत्र रुग्णांसाठी मोफत चष्मे वाटप करून अजित युवा प्रतिष्ठान यांच्याकडून देखील स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत .त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे.
याप्रसंगी युवा नेते अजिंक्य टेकवडे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे ,दौंडज गावच्या सरपंच सीमा भुजबळ यांसह विजय फाळके, अमोल कदम, संतोष चव्हाण, दामुअण्णा कदम, महादेव माने, संभाजी कदम, रुपेश इंदलकर ,अनिकेत माळवदकर, संदेश पवार ग्रामसेवक सुनील माने शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गोतपागर जालिंदर घाटे शोभा काळखैरे अमीन तांबोळी भगवान तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.