वाकी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या होणार भव्य रक्तदान शिबीर
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामपंचायत वाकी व ग्रामस्थ तसेच श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था सोमेश्वर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार दि २६ रोजी भव्य रक्तदान शिबीर हनुमान मंदिर वाकी (ता बारामती) येथे सकाळी ९.०० ते ५.०० पर्यत आयोजन केले आहे.
"चला रक्तदान मोहिम राबवूया,
रक्तदान करुन जीव वाचवुया"
या संकल्पेतून आत्ताच्या कोरोनाच्या काळात ऑक्सिजन व रक्ताचे महत्त्व सर्वांनाच भासू लागल्याने हा उपक्रम राबवत असल्याचे सोमेश्वर-वाकी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिल सदस्यांनी सांगितले , वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून रक्तदात्यांना हेल्मेट व पाण्याचा जीआर देण्याचे आयोजन केले आहे हा उपक्रम राबवत असल्याचा युवकांना आनंदच होणार आहे समाजप्रबोधनात्मक असे काही उपक्रम राबवावेत असे या निमित्ताने पुढे आले आहे ,तर त्यानिमित्त रक्त दात्यांसाठी टू व्हीलर प्रवास करताना स्वसंरक्षणासाठी हेल्मेटचा वापर करावा या उद्देशाने त्यांनी "हेल्मेट" देत त्यातून एक संदेशही समाज्याला दिला आहे.
बारामती तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार असून तालुक्यातील व सोमेश्वरपंचक्रोशीतील युवकांनी रक्तदान जास्तीत ज्यास्त करावे असे वाकी ग्रामपंचायत व श्री सोमेश्वर सेवाभावा संस्था यांच्या वतीने नम्र आव्हान करण्यात आले आहे.
• स्थळ • हनुमान मंदिर वाकी (ता बारामती) येथे सकाळी ९.०० ते ५.००