आषाढ पौर्णिमा बौद्धधर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
करंजे (ता बारामती) येथे शनिवार दिनांक: २४जुलै २०२१आषाढ पौर्णिमा बौद्धधर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हे वर नमूद केलेले आहे.त्यानुसार सौ.प्रतिभा प्रकाश हुंबरे चारिटेबल फौंडेशनच्या बुद्ध विहार करंजे,ता.बारामती जि.पुणे येथील विहारात वर्षावासाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.मंगलमय वातावरणात आदरणीय भंतेजी आयुष्यमान बाबुराव दयाराम हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रार्थना घेण्यात आली..सर्व बौद्ध बंधू भगिनीनी मनोभावे बुद्ध रुपाला वंदन केले..भक्तीमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.दैनिक सम्राट वृत्तपत्रातील समयोचित लेखाचे अभि हुंबरे या विद्यार्थ्यांने आवेशपूर्ण वाचन केले.आदरणीय भंतेजी बाबुराव हुंबरे यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्व सांगितले.नवीन पिढीत गौतम बुद्धांचे विचार रुजावेत.मानवतेच्या मूल्यांची जपणूक व्हावी.भरकटलेल्या समाजाची घडी पुन्हा व्यवस्थित बसावी.हा या कार्यक्रमाचा हेतू नजरेसमोर ठेवून राजर्षि शाहु महाराज मागासवर्गीय शेतकरी बचत गट करंजे हा असे समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.यासाठी प्रकाश हुंबरे,अनिल गायकवाड,किशोर हुंबरे गुरुजी,प्रणाली ग्रुपचे अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभते..या कार्यक्रमास मुरलीधर गायकवाड,सुभाष गायकवाड, दौलत साळवे, सोमनाथ गायकवाड,डॉ.साळवे,आनंदा साळवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय हुंबरे,एस.एस.गायकवाड सर,यांनी विशेष परिश्रम घेतले.वर्षावासाच्या पुढील कार्यक्रमाचे नियोजन किशोर हुंबरे गुरुजी यांनी सांगितल्यानंतर प्रसाद वाटपाच्या कार्यक्रम झाला.व कार्यक्रमाची सांगता झाली...
धम्म आषाढ पौर्णिमा महत्वसंपादन करा
१. या पवित्र पौर्णिमेच्या रात्री सिद्धार्थ गौतमाने माता राणी महामाया यांच्या गर्भात प्रवेश केला होता.
२. याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते
३. राजकुमार सिद्धार्थ आणि राणी यशोधरा यांचे एकमात्र पुत्र राजकुमार राहुल यांचा जन्म ही याच दिनी झाला.
४. भगवान बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश सुद्धा याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी दिला जो पुढे धम्मचक्रप्रवर्तन सुत्त म्हणून प्रसिद्ध झाला.
५. तथागतांनी तीन महिने त्यांची माता राणी महामाया यांना अभिधम्माचा उपदेश दिला.
६. आषाढी पौर्णिमा याच पवित्र पौर्णिमेला वर्षावास सुरु होतो. जेथे तीन महिने भिक्षु आणि उपासक धम्माचा अभ्यास करतात.