मोरगांव येथे विलगीकरण कक्षात चांगल्या सेवा पुरवल्याबद्दल आरोग्य खात्याचा सन्मानीत
मोरगाव प्रतिनिधी
मोरगांव ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गेल्या महीनाभरापासुन सुरु असलेल्या कोरोना विलिनीकरण कक्षामध्ये १२७ रुग्णांवर मोफत उपचार झाले . रुग्णांची संख्या शुन्य झाल्यानंतर आजपासून हे कक्ष बंद करण्यात आले असून आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांचा समारोपाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला .
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मोरगांव ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच निलेश केदारी यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभाग , माहेश्वरी भक्तनिवास , पोलीस प्रशासन ,मोरगाव फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या कोरोना रुग्णांचा अहवाल पॅझीटीव्ह आला आहे मात्र लक्षणे नाहीत अथवा कमी प्रमाणात स्कोर आहे या रुग्नांसाठी कोरोना विलगीकरण कक्ष सुरु केला होता . याचा लाभ मोरगावसह , तरडोली , आंबी , जोगवडी , मुर्टी , मासाळवाडी आदी भागातील रुग्णांनी घेतला .
गेल्या महीनाभरात साधारणतः १२७ रुग्ण पुर्ण बरे होऊन घरी गेले . या काळात रुग्नांची सेवा अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आली .आजपासून हे कोव्हीड विलगीकरण कक्ष बंद करण्यात येणार असल्याने समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच निलेश केदारी ,आमदार रमेश थोरात यांचे स्विय सहाय्यक सुर्यकांत खैरे , माहेश्वरी भक्त निवासचे विश्वस्त श्रेणीक दोशी , ग्रामसेवक मोरेश्वर गाडे , मोरगाव फाऊंडेशनचे सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते . याप्रसंगी उत्कृष्ट सेवा पुरवल्याबद्दल मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी अनिल वाघमारे व सर्व सेवकांचा सत्कार करण्यात आला .