Type Here to Get Search Results !

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी दिपाली साळुंके

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी दिपाली साळुंके 


सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

बारामती तालुका शिक्षक को- ऑप.क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी दिपाली मिलन साळुंके तर व्हाईस चेअरमन पदी मच्छिंद्र भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  

सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेमध्ये संस्थेचे चेअरमन  विशाल रामचंद्र खरात व्हाईस चेअरमन  गणेश चंद्रकांत भगत यांनी राजीनामा दिल्याने संस्थेच्या चेअरमनपदी साळुंके व व्हाईस चेअरमन पदी  भोईटे यांची निवड करण्यात आली. 
या सभेत सचिवपदी संतोष कुमार शंकर राऊत यांची फेरनिवड करण्यात आली.संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरता उपसेक्रेटरी पदी  अण्णा नामदास, शफिक इनामदार व. जालिंदर बालगुडे यांची फेरनिवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित चेअरमन साळुंके यांनी आगामी काळात जाहीरनाम्यात दिलेल्या वचन नाम्यानुसार संस्थेचे उत्पन्न वाढवून सभासदांना जास्तीत जास्त पारदर्शक व आदर्श सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाबद्दल समाधान व आगामी काळातील कामकाजासंदर्भात योग्य त्या सूचना व मार्गदर्शन आदर्श परिवर्तन पॅनलचे नेते हनुमंतराव जगताप व पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमास शिक्षक नेते हनुमंत राव जगताप, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष बाळासाहेब मारणे, राजाराम ढाळे, आगवणे, बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष अशोक माळशिरकारे, राजेंद्र जगदाळे ,सुनील घाडगे, हनुमंत लोखंडे तसेच संचालक नारायण निकम ,तानाजी भोसले ,देविदास ढोले ,दिलीपराव बारवकर ,गणेश भगत ,गजानन गाढवे ,विशाल खरात, बाळासो काळे ,नंदकुमार होळकर, शरद मसाले उपस्थित होते. त्याच बरोबर राहुल होळकर, संजय बारवकर, दत्तात्रेय बालगुडे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब ननावरे ,भरत चव्हाण, सचिन सरवदे नितीन जराड ,काकासाहेब साळुंखे, धनसिंग भुरे, दिलीप  गाडे तसेच तसेच मोठ्या संख्येने संघप्रेमी महिला आघाडी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test