एका २५ वर्षीय महिलेची छेडछाड, धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याने कोऱ्हाळे येथील एकावर गुन्हा दाखल
सोमेश्वरनगर प्रतिनिधि
बुधवार दि.07/07/2021 रोजी दुपारी 2.00 वा.चे सुमारास मौजे मानाजीनगर, कोकरेवस्ती ता.बारामती जि. पुणे येथे फिर्यादी घरात असताना कोऱ्हाळे बु येथील बापू पारसे या आरोपीने फिर्यादी यांचे घरात येवून तुम्हाला तुमची ओमीनी गाडी विकायची आहे का असे म्हणून फिर्यादीच्या पतीचा मो.नं. मागीतला असता फिर्यादी त्यास म्हणाले की, मो.नं. गाडीवर लिहिलेला आहे तो घ्या. तरी आरोपीने फिर्यादीस बोलण्याचा प्रयत्न करून फिर्यादी आरोपीस भैया म्हणाले असता तु मला भैय्या असे म्हणु नको नावाने बोल असे म्हणुन तु माझेकडे वरती बघुन बोल असे म्हणुन माझे घरात वाईट हेतुने येऊन त्याने माझा उजवा हात पकडुन वाईट भावनेने मला बेडवर ढकलले, तु मला, मी काय वरती गेल्यावर फोन करणार आहे काय,? असे म्हणुन तो माझेशी लगट करू लागला. त्यावेळी मी त्याचे गचुरे धरुन मी तुला कशासाठी फोन करु तु माझे ओळखीचा नाही असे म्हणुन मी आरडाओरडा केला असता.तो तेथुन मोटरसायकलवर बसुन निघुन जाताना मी त्याचे मोटरसायकलची चावी काढुन घेतली व मी त्यास तु आता का पळुन चालला, तु माझे घरातील लोक येईपर्यत थांब असे म्हणाले असता त्याने मला शिवीगाळदमदाटी करून धक्काबुक्की केली.
म्हणुन कोकरेवस्ती येथील २५ वर्षीय महिलेने बापु पारसे राहणार को-हाळे ता.बारामती जि.पुणे. यांचेविरूध्द तक्रार दिली आहे.
सदर आरोपीवर वडगाव निंबाळकर पो स्टेशनमध्ये 256/2021 भा द वी कलम - 354, 354 (अ) 452, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.jmfc कोर्ट सो बारामती यांना रवाना करण्यात आला असुन पुढील तपास पो ना खेडकर हे करीत आहेत.