धक्कादायक;बारामतीतील जळगाव कप येथे चिंचेचे झाडाला एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत...?
इसमाच्या प्रेताबाबत माहिती मिळाल्यास तालुका पोलीसांना संपर्क करण्याचे आवाहन…
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुका पोलीस ठाण्यात अनिल भानुदास लोणकर वय.५० धंदा गाव पोलीस पाटील (रा.जळगाव क.प लोणकर वस्ती ता.बारामती जि पुणे ) यांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. २६/०८/२०२१ रोजी लोणकर वस्ती जळगाव क.प.ता बारामती जि.पुणे येथे नरसिंग विठ्ठल वाबळे यांचे पडीक शेताचे बांधावर चिंचेचे झाडाला एक अनोळखी पुरूष जातीचे प्रेत वय अंदाजे २५ ते ३० वर्ष याने नायलॉनचे साडीचे कापडयाने गळफास घेतला असुन अंगात फिक्कट रंगाचा हाफ टि शर्ट,नेसणीस काळपट रंगाची नाईट पॅट डाव्या हाताच्या पोटरीवर बाहेरील बाजुस इंग्रजीत ANIL हे नाब गोंदलेले असुन त्याच हाताचे करंगळी जवळील बोटात पांढरे धातुची कासवाची मुद्रा असलेली अंगठी ई.मयताचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश भोसले हे करत आहेत,या इसमाबाबत काही माहीती आढळून आल्यास बारामती तालुका पोलीस स्टेशन, ता.बारामती जि, पुणे येथे फोन नं.०२११२-२४३४३३ व मो. नं. ९८२३६४४७४४ वर संपर्क साधावा.