शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे महावितरण नरमले...!
बारामती प्रतिनिधी
ऐन संकटात महावितरणने मागील दोन दिवस पूर्व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित केली होती, आज शुक्रवारी भारतीय जनता पार्टिचे किसान मोर्चाचे अध्यक्ष अभिमन्यु गिरमकर व शिरापुरचे माजी सरपंच केशव काळे शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम यांच्या नेतृवाखाली देऊळगाव राजे येथील महावितरण कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला होता ,शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता महावितरण अधिकाऱ्यांनी तबड़तोप वीज पुर्ववत करण्याचे आदेश महावितरण चे अधिकारी यांना दिले.गेल्या तीन दिवसांपासून महावितरण शेतकऱ्यांची विज बिल भरलेली नाही हे कारण दाखऊन लाईट बंद केली होती .पण शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता वीज बिल भरायचे तरी कसे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा आहे , कारण गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कोरोना रोगाचा सामना करीत असून कोणत्याच शेतीमालाला योग्य भाव नाही, अशातच आता मार्च महिन्यात शक्य असेल तेवढी बाकी शेतकऱ्यांनी वीज बिले भरली आहेत, पण आता पुन्हा महावितरण कंपनी शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे, पण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिल भरण्याची नाही,त्यातच परिसरात अजुन पाऊस झालेला नाही, आडसाली लागण केलेले ऊस पाण्याअभावी सुकून चालली आहेत आणि बऱ्याच जागेवर खोड़ किड,उन्नी देखील पडली असून शेतकरी आधीच मेटाकुटिला आला आहे.अशा विविध व्यथा या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या, या वेळी केशव काळे, अभिमन्यु गिरमकर, हरिभाऊ ठोंबरे,राजेंद्र बुऱ्हाडे, बाळकृष्ण पाचपुते, शिवाजी काळे, नंदकिशोर पाचपुते, सचिन कदम ,शेतकरी संघटनेचे राजेंद्र कदम आदि शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा या वेळी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, या सर्वांच्या मागण्यांचा विचार करून लाईट पूर्ववत करण्याचे आदेश दिले. -----------------------------------------------------
समस्त शेतकरी बांधवांच्या मागण्या लिहून घेतल्या असून त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे सादर केल्या जातील व पुढील काळात अशी एकाकी वीज बंद केली जाणार नाही, जर बंद करण्याची वेळ आली तर संबधित गावच्या शेतकरी वर्गाला आणि ग्रामस्थांना पूर्व कल्पना देऊन ग्रामसभेत शेतकरी यांना सूचना केल्या जातील.
...जीवन ठोंबरे-सहाय्यक अभियंता दौंड ग्रामीण महावितरण...
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणुकीच्या वेळी भर सभेत म्हणाले होते की सत्ता आल्यावर शेतकरेंच्या सातबारा कोरा करण्यात येईल पण सध्या परिस्थिती अशी आहे की शेतकरी यांचे वीज बिल माफ करा आणि वीज पुरवठा खंडित करू नका .
...भाजप नेते-केशव काळे...