Type Here to Get Search Results !

अन्न व्यावसायिकांनी विक्री देयकावर नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक

अन्न व्यावसायिकांनी विक्री देयकावर नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक
पुणे : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार १ ऑक्टोबरपासून सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या विक्री देयकावर १४ अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापणे बंधनकारक आहे.
         चौदा अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक हा त्या अन्न व्यावसायिकाची विशिष्ठ ओळख दर्शवितो. परवाना अथवा नोंदणी क्रमांकावरून अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरुन त्या अन्न व्यावसायिकाची परवाना नोंदणीच्या वैधतेबाबत माहिती ग्राहकास मिळू शकते. अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास या परवाना अथवा नोंदणी क्रमांकावरुन ग्राहक अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर थेट तक्रार दाखल करू शकतो. 
       उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच उपहारगृह, रेस्टोरंट, मिठाई विक्रेते यांनी १ ऑक्टोबर  पासून विक्री देयकावर १४ अंकी परवाना अथवा नोंदणी क्रमांक छापून प्रशासनास सहकार्य करावे असे, आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्री. नारागुडे केले आहे.
*****

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test