मु.सा.काकडे महाविद्यालयात कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्ती क्षमता तपासणी शिबिर संपन्न
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामतीतील येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शारीरिक तंदुरुस्ती तपासणी शिबिर महाविद्यालयाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री संजयराव घाडगे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी सध्याच्या कोरोना महामारी च्या काळामध्ये शारीरिक तंदुरुस्ती किती उपयोगी आहे.
व महाविद्यालयाच्या उपलब्ध मैदान आणि क्रीडा सुविधांचा जास्तीत जास्त फायदा कर्मचाऱ्यांनी घ्यावा व स्वतः तंदुरुस्त राहून विद्यार्थ्यांनादेखील आरोग्याचे महत्त्व सांगावे असे म्हटले.
महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी व व्यायामाचे जीवनामध्ये किती महत्वाचे स्थान आहे याबद्दल उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सहसचिव श्री सतीशराव लकडे यांनी क्रीडा विभागाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.बाळासाहेब मरगजे यांनी केले होते. या शिबिरामध्ये एकूण 130 कर्मचाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती तपासणी केली. त्यामध्ये प्रामुख्याने वजन, उंची, बीएमआय, हातातील स्फोटक ताकत, ब्लड प्रेशर, नाडीचे ठोके, ऑक्सीमिटर या घटकांची तपासणी केली.
संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख, सचिव जयवंतराव घोरपडे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, उपप्राचार्य डॉ.प्रवीण ताटे-देशमुख, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप,उपप्राचार्या प्रा. मेघा जगताप, प्रा.सौ सुजाता भोईटे, प्रा.जयश्री शिंदे,पत्रकार विनोद गोलांडे ह्या सर्वांनी उपस्थित राहून शारीरिक तपासणी करून घेऊन इतर कर्मचाऱ्यांना ही प्रोत्साहित केले.
प्राचार्य जवाहर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयक्यूएसी समन्वयक डॉ.संजू जाधव, एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत घाडगे , कनिष्ठ विभागाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. दत्तराज जगताप, कर्मचारी सुजित काकडे, जिमखाना विभागाचे खेळाडू विद्यार्थी कुणाल पाटोळे, शुभांगी गोसावी, वैष्णवी थोपटे, या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.