शिवसेनेच्या नीरा गणप्रमुख पदी राहुल यादव यांची निवड.....
पुरंदर प्रतिनिधी- सिकंदर नदाफ.
पुरंदर तालुक्यात शिवसेनेच्या नीरा गणप्रमुख पदी सुकलवाडी येथील राहुल यादव यांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे माजी जलसंपदा तथा जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.......
याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप यादव , माजी सभापती अतुल मस्के , नीरा कोळ विहिरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई पवार, युवा नेते सागर भुजबळ, वागदरवाडीच्या सरपंच उषा पवार, तसेच शंतनु नवले ,विनोद पवार, दीपक भुजबळ ,अथर्व पवार ,कोळविहिरे गणाचे प्रमुख प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान पुरंदर पंचायत समितीचे माजी सभापती गिरीश पवार यांसह शिवसेना कार्यकर्ते सुरेश पवार ,प्रदीप चव्हाण ,प्रदीप पवार ,मोतीराम गावडे ,दिलीप पवार ,सचिन पवार, आदी मान्यवरांनी राहुल यादव यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.