माणुसकीचे दर्शन घडवणारा खरा कोव्हिड योध्दा.....
जेजुरी प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी येथे मार्तंड देवस्थानच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात कोविड सेंटर ची उभारणी करण्यात आली होती या सेंटरमध्ये देवसंस्थान चे सर्व कर्मचारी, अधिकारी कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करीत होते पण देवस्थानचा एक कर्मचारी जो रुग्णांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि माणुसकी याचे दर्शन घडवणारा होता तो होता जेजुरी नगरपालिकेचा माजी नगरसेवक तथा मार्तंड देवसंस्थाचा व्यवस्थापक "सतिश निवृत्ती घाडगे" आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधीत रुग्णांना देवस्थानच्या वतीने देण्यात येणारा रोज एक टाइम नाष्टा दोन वेळचे जेवण दोन वेळचा चहा जागेवर नेऊन द्यायचा आपली आई आणि तरुण पुतण्या यांचा कोरोना महामारी मुळे मृत्यू झाला असताना देखील मागे न हटता एका लढवय्या योद्धा प्रमाणे त्याने रुग्णांची अहोरात्र सेवा करण्याचे सोडले नाही कोविड सेंटर चालु असेपर्यंत त्याने रुग्णांची सेवा केली मार्तंड देवस्थानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मल्हार भक्त निवास येथे देखील आपली व्यवस्थापकाची भुमिका बजावत येणाऱ्या भाविकांना प्रेमाची वागणुक देणारे जेजुरी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी एखाद्या रुग्णाच्या वैद्यकीय सेवेसाठी फोन केला असता दवाखान्यात जाण्यासाठी देवसंस्थाची ॲम्ब्युलन्स सहजपणे उपलब्ध करून देणारे सतिश निवृत्ती घाडगे हे माणुसकीचे मूर्तीमंत उदाहरण आहे या व्यक्तीमत्वाला व ख-या कोविड योध्द्याला गावकऱ्यांचा सलाम