नेट सेट परीक्षांची तयारी मनापासून करावी-सतीश लकडे.
नेट-सेट सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी मनापासुन केल्यास यश हमखास मिळतेच यासाठी कष्ट करण्याची जिद्द मनाशी बाळगली गेले पाहिजे असे आवाहन मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय (ता बारामती) व्यवस्थापन समितीचे सहसचिव सतीश लकडे यांनी केले.
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि आय. क्यू. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सेट- नेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी होते या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण ताटे -देशमुख महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य आय.क्यू. ए. सी. चे समन्वयक प्रा. डॉ. संजू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
सतीश लकडे यांनी सेट परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना शुभेच्छा देताना या परीक्षेत मोठ्या संख्येने उत्तीर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. जवाहर चौधरी यांनी वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट परीक्षा अनिवार्य असल्याचे सांगितले या प्रसंगी डॉ. प्रविण ताटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, नेट सेट सारख्या परीक्षांचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने करायला हवा. आपल्या विषयाच्या सखोल ज्ञानाची आणि शिक्षक म्हणून करायच्या जबाबदारीचे भान निर्माण करणारी ही परीक्षा आहे.
नेट -सेट परीक्षेच्या तयारीसाठी च्या या कार्यशाळेत परीक्षेच्या पहिल्या पेपरची तयारी करून घेण्यासाठी पाच सत्रांमध्ये प्रा. संतोष शेळके, प्रा.डॉ. राहुल खरात, प्रा. डॉ. राहुल खरात, प्रा. डॉ. रेश्मा पठाण, प्रा. आदिनाथ लोंढे आणि प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी तज्ञ साधन व्यक्ती म्हणून परीक्षार्थींना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय, मु. सा. काकडे महाविद्यालय आणि परिसरातील 50 हून अधिक परीक्षार्थी विद्यार्थी- प्राध्यापक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयातील नेट-सेट परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. अजय दरेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. कल्याणी जगताप यांनी मानले.
याप्रसंगी जिमखाना विभागाचे संचालक प्रा. डॉ. बाळासाहेब मरगजे, एनसीसी प्रमुख प्रा. डॉ. श्रीकांत घाडगे एन.एस.एस.चे कार्यक्रमाधिकारी प्रा. अच्युत शिंदे, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्य प्रा. मेघा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.



