महेश(सारंग)बोकील यांचे ४५ व्या वर्षी अल्पशा आजाराणे निधन.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजे येथील महेश(सारंग) प्रभाकर बोकील यांचे गुरुवार दि ३० रोजी सकाळीच अल्पशा आजाराने निधन झाले ते ४५ वयाचे होते,ते वोडाफोन पुणे येथील वोडाफोन कंपनीमध्ये कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात आई सुनंदा,पत्नी वनश्री,दोन मुले कु.अजिंक्य व कु.ओंकार,विवाहित दोन बहिणी,भाऊ निलेश बोकील असा परिवार असून प्रसिद्ध पुरोहित प्रभाकर पांडुरंग बोकील यांचा ते जेष्ठ चिरंजीव होत.
महेश बोकील यांच्या निधनाने सोमेश्वर-करंजेगावं परिसरात शोककळा पसरली आहे.



