Type Here to Get Search Results !

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना २०२०-२०२१ यावर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन; सभेपुढील या..दहा विषय होणार चर्चा.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना २०२०-२०२१  यावर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा  कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन; सभेपुढील या..दहा विषय होणार चर्चा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,

अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस
(फक्त सभासदांसाठी)
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि, सोमेश्वरनगर, ता.बारामती, जि.पुणे या संस्थेची सन
२०२०-२०२१ या वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभुमीवर शासकीय नियमांनुसार/आदेशानुसार बुधवार दिनांक २९/०९/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन (Other Audio Visual Means) पध्दतीने खालील विषयांवर
विचार विनिमय करणेसाठी आयोजित केलेली आहे. तरी सदर सभेमध्ये आपण ऑनलाईन पध्दतीने
सहभागी व्हावे अशी विनंती आहे.

---- सभेपुढील विषय ----

विषय क्रमांक तपशिल...

१) मागील दि.२९/३/२०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.
२) संस्थेचे सन २०२०-२०२१ या वर्षाचा मा.संचालक मंडळाकडून आलेला अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके दाखल करुन घेणे व त्याचा स्विकार करणे.
३) सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकातील तरतुदीपेक्षा जादा झालेल्या खर्चास मा.संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मंजूरी देणेबाबत विचार करणे.
४) सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाकरीता मा.संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकाची व त्यांनी सुचविलेल्या भांडवल उभारणीबाबतची नोंद घेणे.
५) वैधानिक लेखा परीक्षक यांनी कारखान्याच्या सन २०२०-२०२१ या वर्षाच्या दिलेल्या लेखा परीक्षण
अहवालाची नोंद घेणे व मागील सन २०१९-२०२० या वर्षाचा लेखा परीक्षण अहवालाचा
मा.संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे.
६) सन २०२१-२०२२ वर्षाकरीता शासनमान्य लेखापरिक्षकांच्या नामतालिकेमधून वैधानिक लेखा
परिक्षकांची नेमणूक करणे व लेखापरिक्षण शुल्क, ठरविणे.
७) सभासद भागाची (शेअर्स) दर्शनी मुल्यांमध्ये वाढ करणेबाबत महाराष्ट्र शासन, सहकार, पणन व
वस्त्रोद्योग विभाग, मुंबई यांचे दि.१८/०५/२०२१ रोजीच्या शासन आदेशाची नोंद घेवून पुढील
कार्यवाही करणे.
८) जुन्या येणे रक्कमा निर्लेखित (राईट ऑफ) करणेबाबत विचार करणे.
९)कारखाना कार्यक्षेत्रातील नव्याने विभाजन झालेल्या गावांचा पोटनियमामध्ये समावेश करणेचा निर्णय घेणे.
१०) मा. अध्यक्षसोा यांचे पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर विचार करणे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test