एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा खून केल्याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटनेने केले आहे. याबाबतचे निवेदन बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना दिले आहे. चाफळ (ता. पाटण, जि. सातारा) येथे दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय नराधमाने नुकताच खून केला. हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी, असे या निवेदनात नमूद केले आहे. पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने, रामदास खोमणे, अनिल भंडलकर रवींद्र जाधव, पांडुरंग घळगे, विकास जाधव, सागर जाधव, संतोष भंडलकर, प्रवीण माकर, सचिन यादव, विजय तावरे, हिंदुराव सोरटे आदी उपस्थित होते.



