बारामती ! 'मिशन कवच कुंडल' या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण ; 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम सुरू.
बारामती प्रतिनिधी : बारामतीतील 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की 'मिशन कवच कुंडल' या अंतर्गत तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण सुरू आहे, दिनांक 08 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, ज्या नागरीकांचा पहिला व दुसरा डोस घ्यायचा राहिला असेल त्यांनी तात्काळ तो घ्यावा ही विनंती. सदर मोहीम सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे व बारामती शहरातील वेगवेगळ्या लसीकरण केंद्रावर सुरू आहे तसेच याच मोहिमेअंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त सलग 75 तास कोविड लसीकरण बारामती मध्ये महिला हॉस्पिटल या ठिकाणी उद्या दिनांक 11 ऑक्टोबर सकाळी नऊ वाजेपासून सलग 75 तास रात्रंदिवस सुरू राहणार आहे याचा बारामतीतील नागरिकांनी लाभ घ्यावा व आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे ही नम्र विनंती
आरोग्य विभाग बारामती